बस्ती : उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा साखर कारखान्याने यावर्षी ३४ लाख ५० हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आता ऊस शिल्लक नसल्याने गाळप थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी ही माहिती दिली. या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ३४ लाख ५० हजार क्विंटल उसाचे गाळप केल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २८ डिसेंबरपर्यंतच्या पैसे दिले आहेत. उर्वरीत पैसेही लवकरात लवकर देण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.