शाहजहांपूर(उत्तरप्रदेश): प्रशासनाने पूर्व भागातील चिन्हांकित 84 गावातील ऊस माफियांना रडारवर घेतले आहे. जिल्हाधिकारी इंद्र विकम सिंह यांनी सोमवारी ऊस सर्वेच्या रँडम चेकिंगचे निर्देश दिले. एस डीएम यांना सांगण्यात आले की, ऊस विकास विभाग तसेच साखर कारखाना कर्मचारी ऊस सर्वे करत आहेत. या सर्वाचेच रँडम चेकिंग केले जावे.
सर्वे मध्ये 192 कर्मचारी आहेत. जे जिल्ह्यातील असणाऱ्या 5 साखर कारखान्यांशिवाय बरेली जिल्याच्या फरीदपूर साखर कारखाना, हरदोई जिल्ह्यातील लोणी तसेच रूपा पूर साखर कारखाना आणि लखीमपूर जिल्यातील अजबापूर साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्राचाही सर्वे केला जात आहे.
जिल्यामध्ये मध्ये 1.97 लाख ऊस शेतकरी आहेत. यापैकी 75 हजारांनी ऊस सर्वे पूर्ण करुन घेतला आहे. 50 टक्के कार्य पूर्ण झाल्यानंतर ऊस विभाग प्रशासनाला सारा अहवाल सादर करेल. यानंतर एस डीएम सर्वेच्या दर्जाची गुणवत्ता तपासतील.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसाच्या सर्वेच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. विभागाकडून एका आठवडयाने याचा आढावा मिळेल. यानंतर या तपासणीत भू -अभिलेखांचा आढावा याला जोडला जाईल. तपासणीसाठी सर्वात संवेदनशील गावांची एक यादीही बनवण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.