शाहू कारखान्याने सभासद, कर्मचाऱ्यांमुळे यशोशिखर गाठले : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : सभासदांचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. कारखान्याचे सभासद व कर्मचारी हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. कारखान्याच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कारखान्याच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासदांसह कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन यावर्षीपासून बक्षीस स्वीकारण्याचा मान निवडक कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यापुढे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांच्या वारसांनाही पुरस्कार स्वीकारण्याची संधी दिली जाईल. यावेळी, कारखाना प्रांगणातील छ. शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कारखाना सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेशही घाटगे यांच्या हस्ते वितरित केले. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आजी – माजी संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. शशिकांत धनवडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here