शामली : ऊस उत्पादनात शामली जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी विभागात अव्वल स्थानावर आहे. ऊस विभागाने गळीत हंगाम २०२०-२१ मधील आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ऊस उत्पादन १००४.२८ क्विंटल प्रती हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. ऊस उत्पादनात मुजफ्फरनगर जिल्हा दुसऱ्या आणि मेरठ जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशातील ४५ जिल्ह्यांमध्ये उसाचे उत्पादन केले जाते. दरवर्षी ऊस आणि खोडवा उसाची कापणी केली जाते. यावर्षी गेल्या गळीत हंगामापेक्षा कमी ऊस साखर कारखान्यांकडे गाळपासाठी आला. अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस गुऱ्हाळ आणि क्रशरला पाठवला. गळीत हंगाम २०१९-२० मध्ये साखर कारखान्यांनी ३७८.१२ लाख क्विंटल आणि २०२०-२१ मध्ये ३५५.१४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. शामली जिल्ह्यने १००४.२८ क्विंटल प्रती हेक्टर उसाचे उत्पादन केले. तर मुजफ्फरनगर जिल्ह्यात ९२३.२० क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन झाले आहे. दरम्यान २०२१-२२ या गळीत हंगामासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा सरासरी ऊस उत्पादनात अव्वल आहे. साखर कारखाने आणि कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हे यश मिळाले आहे असे शामलीचे जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह यांनी सांगितले. तर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विकास मलिक म्हणाले, ट्रेंच पद्धतीने शेतकऱ्यांना ऊस उत्पादन अधिक मिळवणे शक्य झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link