लखनौ : उत्तर प्रदेशने गेल्या काही वर्षात ऊस आणि साखर उत्पादनात जोरदार आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या साखर उद्योगाच्या विकासात शामली जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे. उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम २०२२-२३ मधील ऊस उत्पादकतेमध्ये १०२५.१२ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादनासह शामली जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याच्या पश्चिम विभागातील शामली, मुझफ्फरनगर आणि मेरठ हे तीन जिल्हे ऊस उत्पादांत आघाडीवर आहेत.
याबाबत, द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेश साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ च्या गळीत हंगामात राज्यातील एकूण ऊस उत्पादकता ८३९.४८ क्विंटल प्रती हेक्टर राहिली. मुझफ्फरनगरमध्ये प्रती हेक्टर ९४८.८४ क्विंटल आणि मेरठमध्ये ९१४.९५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादनासह या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.