शामली: शामली साखर कारखान्यामध्ये शनिवारी ऊस गळीत हंगामाची समाप्ती करण्यात आली. यंदाचा गळीत हंगाम समाप्त करताना कारखान्याने ९९.८० लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. तर गेल्या हंगामात कारखान्याने एक कोटी सात लाख क्विंटल ऊस गाळप करून एक उच्चांक प्रस्थापित केला होता.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यंदाच्या हंगामात साखर कारखान्याला अनेक वेळा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऊसाचे गाळप अतिशय संथ झाले. दरम्यान, हंगाम समाप्तीनंतर कारखाना व्यवस्थापनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सद्यस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यात साखर कारखाना पिछाडीवर आहे. साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत.