शामली : भारतीय शेतकरी कामगार संयुक्त युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा ऊस अधिकारी, ऊस समितीचे सचिव आणि शामली साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक यांना निवेदन देवून लवकरात लवकर ऊस बिले देण्याची मागणी केली. गळीत हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, शामली कारखान्याने अद्याप फक्त १२ टक्के बिले दिली आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे आणि शेतीच्या कामाला पैसे नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघटनेने शंभर टक्के ऊस बिले लवकरात लवकर मिळावीत अशी मागणी केली. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष सत्येंद्र देशवाल उर्फ पप्पू, राजवीर सिंह मुंडेट, सत्येंद्र सिंह, योगेंद्र सिंह मलिक, राजपाल सिंह चौहान, विनोद कुमार मीमला, वरुण बधेव उपस्थित होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या गेटवर आज महापंचायतीचे आयोजन केले आहे. त्यासाठी शेतकरी नेते विनोद निर्वाल यांनी अनेक गावांचा दौरा करून जागृती केली आहे. शामली कारखान्याने ३०७ कोटी रुपये तर थानाभवन कारखान्याने ३५२ कोटी रुपये आणि ऊन कारखान्याने २३० कोटी रुपये थकवले आहेत असे निर्वाल यांनी सांगितले.