तांत्रिक बिघाडामुळे शामली साखर कारखाना सात तास बंद

शामली : बॉयलरमधील तांत्रिक बिघाडामुळे शामलीतील अप्पर दोआब साखर कारखाना सुमारे सात तास बंद राहिला. बॉयलरची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. यांदरम्यान, कारखान्यातील बिघाडाची माहिती ऊस घेवून येणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे देण्यात आली होती.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सकाळी बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ११ वाजता अप्पर दोआब साखर कारखाना बंद करण्यात आला. जोपर्यंत दुरुस्ती पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत ऊस पाठवू नका असा संदेश साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पाठविण्यात आला. जवळपास सात तास कारखाना बंद राहिला. सायंकाळी सहाच्या सुमारास बॉयलरमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. शामली कारखान्याच्या ऊस विभागाचे सरव्यवस्थापक सुशील खोकर यांनी सांगितले की, कारखान्याच्या बॉयलरमध्ये अनपेक्षितपणे बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून कारखाना आता पु्न्हा सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here