उत्तर प्रदेश : ऊस गाळपाला नेणार्या शेकडो बैलगाड्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहेत. यामुळे असंख्य समस्या भेडसावत आहेत. यामुळे संतापलेले माजी आमदार राजेश्वर बन्सल यांनी कुटुंबासह शामली सोडण्याचा इशारा दिला आहे.
माजी आमदार बन्सल यांचे घर शामली जिल्ह्यातील एका नामांकित साखर कारखान्याच्या जवळ आहे. त्यामुळे कारखान्यात गाळपासाठी येणार्या ऊसामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. या समस्येला कंटाळलेल्या आमदारांनी बुधवारी हा इशारा दिला.
याबाबत शामली जिल्हा दंडाधिकारी जसजित कौर यांनी साखर कारखान्याच्या अधिकार्यांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवला जाईल, असे बन्सल यांना सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.