शामली : शामली साखर कारखान्याकडे ऊस घेवून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली. त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला. सोमवारी मध्यरात्री कारखान्यात नो केन स्थिती निर्माण झाली होती. जवळपास ११ तास कारखाना बंद राहिला. त्यानंतर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस जमा करून कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना सुरू होताच, शहरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. शहरातील साखर कारखाना गेटपासून नगरपालिका गेट, पोलिस ठाण्यापासून हॉस्पिटल रोड, बुढाना रोड, अग्रसेन चौक ते वर्मा मार्केपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. शामली साखर कारखान्याचे सहाय्यक सरव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, नो केन स्थितीनंतर साखर कारखाना दुपारी एक वाजता पुन्हा सुरू करण्यात आला. कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकरी शहरात मोठ्या प्रमाणात ऊस घेवून आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. कारखान्याने गतीने गाळप सुरू केले आहे.