कोल्हापूर, : कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर गळीत हंगाम संपला असतानादेखील लाॅकडाऊन मुळे कारखाना परिसरामध्ये अडकून पडलेल्या 12 जिल्ह्यांमधील ७०० च्या वर मजुरांची आज शरद कारखान्याच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रवानगी केली.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची बसेस, आयशर टेम्पो, ट्रक्स अशा वाहनांमधून ऊसतोड मजूर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी यंत्रणा रवाना झाली. बीड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, हिंगोली, वाशिम व यवतमाळ अशा बारा जिल्ह्यातील मजूर यावेळी आपापल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले.. आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे. शेती अधिकारी दीपक पाटील व कारखान्याचे जनरल मॅनेजर भुपाल आवटी यांनी याचे नियोजन केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.