हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
उस्मानाबाद येथील तेरणा साखर कारखान्याने कर्जाची रक्कम न भरल्यामुळे अडचणीत आलेल्या कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी दीड महिन्यापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यादरम्यान लोकसभा निवडणूक चालू होती आणि हा प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेमके निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उस्मानाबादेत आल्यानंतर यांनी कसबे तडवळ्यात जाऊन आत्महत्याग्रस्त ढवळे कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली तसेच त्यांच्या मुलाला स्वत:च्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते..
दिलीप ढवळे यांनी तेरणा साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतूकीसाठी करार केला होता व त्या करारानुसार वसंतदादा बँकेकडून दिलीप ढवळे यांनी कारखान्यामार्फत कर्ज घेतले होते. मात्र, ऊस वाहतूक केल्यानंतर कर्जाची परतफेड केली मात्र उलट त्यांच्या जमिनीचा लिलाव पुकारण्यात आला सदर प्रकरणास ६-७ वर्षे पाठपुरावा करूनही काहीही होत नसल्याने ढवळे यांनी अखेर गळफास घेतला व आपली जीवनयात्रा संपविली.
शरद पवारांनी शब्द पाळला
दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार तडवळ्यात गेले होते त्यावेळी त्यांनी दिलीप ढवळे यांचा मुलगा निखिल याच्या शिक्षणाबद्दल माहिती घेऊन त्याला संस्थेत नेाकरीवर घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार निखिलला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नोकरी देण्यात आली असून तो सोमवारी रूजू झाला.