नवी दिल्ली : माजी केंद्री कृषी मंत्री शरद पवार यांनी साखर कारखानदारांना २०१६-१७ या हंगामाबाबत जारी केलेल्या आयकर नोटीसांबाबत सहकारी कारखान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊस आणि साखर उत्पादन पाहता साखर कारखान्यांनी इथेनॉल आणि सीएनजीसारख्या इतर उत्पादकांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाबाबत तोडगा काढण्यासह कारखान्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सचे आधुनिकीकरण करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडद्वारे (एनएफसीएसएफ) आयोजित पुरस्कार वितरण समारंभात बोलताना पवार म्हणाले, विविध राज्यांतील साखर कारखान्यांना ४० हून अधिक दक्षता पुरस्कार मिळाले आहेत. देशातील शेतकऱ्यांनी सर्वोच्च ऊस उत्पादनाचे उद्दीष्ट गाठले आहे. ऊसाचे क्षेत्र ५५ लाख हेक्टरपर्यंत आहे तर प्रती हेक्टर उत्पादन ८५ टन आणि साखर उतारा ११ टक्के इतका आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे कारखान्यांना तरलतेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यातुन ऊस उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कारखानदारांनी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओत विविधता आणण्याची गरज आहे.