कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखान्याने आपली गाळप क्षमता आता ५ हजार ४०० टन केली आहे. पुढील दोन वर्षात ही गाळप क्षमता ७,५०० टन आणि नंतर प्रती दिन १० हजार टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट नइश्चित केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. नरंदे (ता. हातकणंगले) येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सभेस उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली.
राजेंद्र पाटील म्हणाले की, कारखान्याने शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. डिस्टलरी प्रकल्प लवकरच कर्जमुक्त होईल. कारखान्याची एफआरपी २,७७५ रुपये असताना उसाला ३,१०० रुपये दर दिला आहे. कर्मचाऱ्यांना १२ टक्के पगारवाढ दिली आहे. यावेळी प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी यांनी नोटिशीचे वाचन केले. सुभाषसिंग रजपूत यांनी आभार मानले. माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील, आदित्य पाटील- यड्रावकर, उपाध्यक्ष थबा कांबळे, रावसाहेब भिलवडे, अभिजित भंडारी, संजय नांदणे, अजित उपाध्ये, प्रतापरावा देशमुख, पोपट भोकरे, आप्पासो चौगुले उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.