धामपूर शुगर मिल्सच्या शेअरने पाच दिवसांत दिला २५ टक्के रिटर्न

मुंबई : धामपूर शुगर मिल्सच्या शेअरने गेल्या पाच सत्रांमध्ये जबरदस्त रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरने पाच दिवसांत २७.५ टक्के रिटर्न दिला आहे. सोमवारी बीएसईवर धामपूर शुगर मिल्सचे शेअर १९.५१ टक्के तेजीने ५३९.४५ रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात ३५.८१ टक्के रिटर्न दिले आहेत. तर एका वर्षाच्या कालावधीत शेअर्सने १८२ टक्के रिटर्न दिले आहेत.

बीएसईच्या सेन्सेक्समध्ये यावर्षी जवळपास २७०० अंकांची घसरण झाली आहे. धामपूर शुगर मिल्सच्या शेअर्सनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना ७५.५ टक्के रिटर्न दिला आहे. यावर्षी ३ जानेवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ३०७.२५ रुपयांना होता. १४ मार्च २०२२ रोजी कंपनीचा शेअर ५३९.४५ रुपयांच्या स्तरावर बंद झाला. तर गेल्या ६ महिन्यात कंपनीच्या शेअर्सने ७७ टक्के रिटर्न दिला आहे. धामपूर शुगर मिल्सच्या शेअरने २० मार्च २०२० रोजी बीएसईवर ८८.४५ रुपयांच्या स्तरावर होते. जर एखाद्या व्यक्तीने २० मार्च २०२० रोजी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्यांच्याकडे ६.०९ लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअरचा ५२ वीक हायचा उच्चांक ५४१.६५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल ३५८० कोटी रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here