भुवनेश्वर : राज्य सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंच्या वार्षिक गरजे बाबत विधानसभेत दिली गेलेली माहिती वास्तविक खपापेक्षा खूप वेगळी आहे. अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असलेले ओडिसा राज्य आजही जीवनावश्यक वस्तूंसाठी इतर राज्यांवर खूप प्रमाणात अवलंबून आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, साखरेची वार्षिक गरज २.२४ लाख टन इतकी आहे. मात्र, राज्यात साखरेचे उत्पादन केवळ १०,००० ते १५,००० टन आहे. कारण ओडिसामध्ये सर्व साखर कारखाने आजारी पडत आहेत. गंजम जिल्ह्यातील अस्का येथे सुरू असलेला एकमेव साखर कारखाना खूप कमी क्षमतेने सुरू आहे आणि तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या (NSSO) ६८ व्या सर्वेक्षणानुसार, राज्यात २०२०-२१ मध्ये डाळींची वार्षिक गरज २.९५ लाख टन होती. आणि या आर्थिक वर्षात डाळींचे उत्पादन १०.४३ लाख टन होती. ओडिशा व्यापारी संघटनेचे महासचिव सुधाकर पांडा यांनी सांगितले की, राज्याला डाळींची सरासरी गरज जवळपास ९ लाख टन आहे. आणि या उत्पादनाचा खूप मोठा भाग गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा राज्यांकडून खरेदी केला जातो. NSSO च्या म्हणण्यानुसार, खाद्यतेलाची वार्षिक गरज २.५९ लाख टन आहे.
कृषी आणि बागायती संचालनालयाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये राज्य सरकारचे तिळाचे उत्पादन ४.७९ लाख टन होते. पांडा यांच्या म्हणण्यानुसार ओडिशातील वार्षिक खाद्य तेलाची गरज ६ ते ६.५ लाख टनादरम्यान आहे. खाद्य तेलाचे राज्यात उत्पादन नगण्य आहे. त्यामुळे ही गरज भागविण्यासाठी राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा इतर राज्यांतून आणखी पामतेल आयात करण्यात येते.