भारत, युरोपियन युनियन आणि थायलंड यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे 2019/20 मध्ये साखरेच्या किेंमती वाढण्याची अपेक्षा होती. पण कोविड मुळे लागू झालेल्या लॉकडाउन मुळे फेब्रुवारी ते एप्रिल 2020 दरम्यान किंमती 30 टक्क्यांपेक्षा जास्त खाली आल्या.
ब्राझील आणि थायलंडमध्ये प्रतिकूल हवामान आणि युरोपच्या उत्पादनात घट झाल्याने आता 2020/21 च्या हंगामासाठी भारताकडे लक्ष वेधले गेले आहे. कारण २०२०/२१ मध्ये मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे . जागतिक तूट उत्पादनातील परिस्थितीत भारतातील साखरेचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा आहें, पण कॅरी ओव्हर च्या किेंमतींमध्ये वाढ होवू शकते.
आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने चालू वर्षातील 174.6 मेट्रीक टनाच्या वापराच्या तुलनेत जागतिक साखर उत्पादनाच्या 171.1 मेट्रिक टनाचा अंदाज लावला आहे. युरोपियन युनियन, ब्राझील आणि थायलंडमधील कमी उत्पादनामुळे साखरेची तुट अधिक प्रमाणात जाणवणार आहे.
ब्राझील चे साखर उत्पादन खराब हवामान आणि कच्च्या तेलासाठी तुलनात्मक दृष्टीकोनामुळे घटले आहे. तर कमी लागवड आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे युरोपियन संघाने सलग तिसर्या वर्षी साखर उत्पादनात घट नोंदवली आहे. लॉकडाउनवरील निर्बंध कमी केल्याने प्रमुख आशियाई देशांमधील विशेषत: इंडोनेशिया आणि चीन या देंशांकडून साखरेची मागणी जास्त होण्याची शक्यता आहे.2021 मध्ये इंडोनेशिया 10 टक्क्यांनी अधिक साखर आयात करणार आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 मध्ये चीनने 4.36 मेट्रीक टन साखर आयात केली आहे.
साखरेच्या उत्पादनात 1.5 मेट्रीक टनांच्या इथेनॉल डायर्व्हझन मुळे घट झाल्याचे दिसून आले असले तरी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादन वाढीमुळे 30.5 मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे इस्माने सांगितले आहे. परदेशी बाजारापेठेत विशेषत: इंडोनेशियात जास्तीत जास्त 6 दशलक्ष टन साखरेची विक्री करण्यास भारत सक्षम असणे गरजेचे आहे.
कच्च्या तेलाचे सतत वाढते दर आणि जागतिक पातळीवरील कमी उत्पादन यामुळे साखरेच्या किंमतींना आवश्यक ते समर्थन मिळेल. तर चालू हंगामात आणि जवळपास स्थिर देशांतर्गत मागणी या तुलनेत चांगल्या उत्पादनामुळे नफ्यावर चांगला परिणाम होईल.