कोल्हापूर : श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सची तोडणी वाहतूक यंत्रणा यावर्षी अधिक सक्षम आहे. कारखान्यामध्ये नवतंत्रज्ञान वापरून नवीन मशिनरी बसवण्यात आल्या आहेत. श्री अन्नपूर्णाच्या या गळीत हंगामात प्रतिदिनी १८०० मेट्रिक टन ऊस गाळप केले जाणार आहे. गळीत हंगामात अन्नपूर्णा अडीच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक, चेअरमन संजय घाटगे यांनी केले. केनवडे (ता. कागल) येथे कारखान्याच्या पाचव्या. बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी ते बोलत होते. बॉयलर अग्निप्रदीपन संचालक विश्वास दिंडोर्ले व त्यांच्या पत्नी संगीता दिंडोर्ले यांच्या हस्ते पूजन केले. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, युवा नेते वीरेन घाटगे उपस्थित होते.
चेअरमन घाटगे म्हणाले की, कारखाना क्लिनिंग काळातदेखील बंद राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. दर्जेदार गुणवत्तेची गूळ पावडर व खांडसरी साखरेचे चांगले उत्पादन होईल. कारखान्याच्या तांत्रिक त्रुटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावेळी अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याचे यश हे उसाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. कार्यक्रमास अरुंधती घाटगे, सुयशा घाटगे, संचालक धनाजी गोधडे, ए. वाय. पाटील, आनंदा साठे, मल्हारी पाटील, के. के. पाटील, दिनकर पाटील, धनराज घाटगे, एम. बी. पाटील, तानाजी पाटील, राजू भराडे, सोनूसिंह घाटगे, आण्णासो चौगले, दिलीप पाटील, चिफ इंजिनिअर राजू मोरे, फायनान्स मॅनेजर शामराव चौगले, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, चिफ केमिस्ट सुनील कोकितकर, डी. एस. पाटील, सचिन गाडेकर, अशोक पाटील, धोंडिराम एकशिंगे, किरण पाटील, अरुण पोवार आदी उपस्थित होते. रणजित मुडूकशिवाले यांनी स्वागत केले. सुभाष पाटील यांनी सूत्रसंचलन केले. नानासो कांबळे यांनी आभार मानले.