श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : कार्यकारी संचालक अशोक जाधव

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी दिली. भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी टाकण्याच्या कार्यक्रमामध्ये जाधव बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्याकडून सर्व तयारी झाली आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २१ हजार ४८१ एकर ऊस गळीतास उपलब्ध असून आठ लाख टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ३ लाख टन गेटकेन ऊस उपलब्ध होऊन ११ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी दररोज ९५०० ते १० हजार टन उसाचा पुरवठा होईल. असे ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन केले आहे.

यावेळी कारखान्याचे विकास क्षीरसागर व पूनम क्षीरसागर, हनुमंत करवर व स्वाती करवर यांच्या बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी, जालिंदर शिंदे यांचे हस्ते काटापूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेव पाटील, दत्तात्रेय सपकळ, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, सर्जेराव जामदार, नारायण कोळेकर, बाळासाहेब सपकळ, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे, कामगार नेते युवराज रणवरे, माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, तानाजी थोरात, विशाल निबांळकर, अमरसिंह कदम, उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here