श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा तोटा आटोक्यात आणू : कोल्हे

अहमदनगर : श्रीगणेश सहकारी साखर कारखान्यातर्फे आगामी हंगामात सव्वातीन लाख टन गाळप करून तोटा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू, असे मत सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. ते म्हणाले, संचालक मंडळासह कामगारांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळपास येण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले.

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. संचालक नारायणराव कार्ले म्हणाले कि, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. यावेळी एकनाथ गोंदकर, गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे, वसंतराव लबडे, संचालक बाबासाहेब दंगे, संपतराव हिंगे, अनिल टिळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here