नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमती जरी कमी झाल्या, तरी इथेनॉलच्या मागणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. देशात इथेनॉल अद्यापही इंधनाच्या तुलनेत अधिक किफायतशीर आहे आणि श्री रेणुका शुगर्सने आपली इथेनॉल क्षमता ५२० केएलपीडीवरून वाढवून १२५० केएलपीडी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
चतुर्वेदी म्हणाले की, भारत २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनासाठी कटिबद्ध आहे आणि सरकारने या दिशेने मजबुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. इथेनॉलचा फायदा महसूल वाढीसाठी होईल. आणि इथेनॉल क्षमतेचा विस्तार केल्याचा पूर्ण फायदा FY२४ मध्ये मिळेल. ते म्हणाले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामात आमचे इथेनॉल उत्पादन २५ ते ३० टक्के अधिक आहे. इथेनॉल निश्चित रुपात आमचा महसूल वाढविण्यास मदत करीत आहे आणि त्यातून आम्हाला हंगामादरम्यान, अतिरिक्त साखरेच्या संकटापासून सुटका होण्यास मदत मिळत आहे. त्यातून आमच्या रोखतेच्या प्रवाहात सुधारणा झाली. ते पुढे म्हणाले की, पुढील काळातही आमचा इथेनॉलवर अधिक भर राहील. साखर निर्यात महसूल वार्षिक आधारावर ४० ते ५० टक्क्यांनी वाढत आहे.
देशात साखरेचे उत्पादन ३३ मिलियन टन होण्याची शक्यता असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले आणि साखर निर्यात ६ मिलियन टन होईल, असे ते म्हणाले. FY-२३ EBITDA मार्जिन ४० टक्क्यांपेक्षा अधिक महसूलात वाढीसह खूप चांगले आहे. सरकार इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देवून कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करत असून, त्यासोबतच साखर उद्योगाच्या महसुलासाठी एक अतिरिक्त स्त्रोतही मिळवून देत आहे, असे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.