मुंबई : इथेनॉल उत्पादनासाठी देशात अनेक कंपन्या पुढे येत आहेत. यामध्ये श्री रेणुका शुगर्सचेही नाव समाविष्ट आहे.
ईटी नाऊला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, पुढील वर्षी कंपनीचा इथेनॉल सेगमेंटमधील महसूल १४ टक्क्यांवरून वाढून ३५-४० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, ज्यामध्ये साखरेला तेल वितरण कंपन्यांकडे वळविण्यावर भर दिला जाईल. कंपनीने इथेनॉल उत्पादन क्षमता ७०० केएलपीडीवरून वाढवून १४०० केएलपीडी केली आहे. यामध्ये सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. इथेनॉल उत्पादन क्षमता डिसेंबर २०२२ पासून वाढेल अशी अपेक्षा आहे. कंपनीचे इथेनॉल उत्पादन गेल्या चार वर्षात ३६ टक्के वाढून १.६ लाख KL झाले आहे.
अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, साखरेच्या किमती सहा महिन्यांमध्ये ३० रुपये ते ३२ रुपये प्रती किलो यादरम्यान स्थिर आहेत. अतिरिक्त साखर उत्पादनाची सध्या समस्या नाही. पुढील वर्षी ४.५ लाख मिलियन टन साखर इथेनॉलसाठी डायव्हर्ट केली जाणार आहे.