श्री रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये तीन महिन्यांत ६५ टक्क्यांची वाढ

भारतीय शेअर बाजारात शुगर सेक्टरमध्ये शेअर्सकडून चांगली कामगिरी केली जात आहे. गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळत आहे. श्री रेणुका शुगर्सनेही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला लाभ दिला आहे.

श्री रेणुका शुगर्सचे शेअर गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढले आहेत. गुरुवारी रेणुका शुगर्सचे शेअर ४९.५० रुपयांच्या आपल्या अप्पर सर्किट स्तरावर होता. तर शुक्रवारी सकाळच्या सत्रात हा शेअर ५२.४० ते ५५.६० रुपये यांदरम्यान ट्रेड करीत होता. या दोन दिवसांच्या तेजीनंतर गेल्या आठवडाभरात हा शेअर आपल्या गुंतवणूकधारकांना चांगले रिटर्न देण्यात सक्षम बनला आहे.

गेल्या तीन महिन्यात श्री रेणुका शुगर्सच्या शेअरमध्ये ६५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ३१ डिसेंबर रोजी हा शेअर ३०.०५ रुपयांवर बंद झाला होता. आता हा शेअर ५१.८० रुपयांच्या स्तरावर ट्रेड करीत आहे.

बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात रेणुका शुगर्सचे अधिग्रहण अदानी समुहाकडून केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर्सच्या किमतीत तेजी आली आहे. मात्र, बाजारातील एक्स्पर्ट्सच्या म्हणण्यानुसार, कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन केलेले नाही. मात्र शेअरमधील तेजी ही विचारात घेण्याजोगी आहे.
साखर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजीची अनेक कारणे आहेत. यामध्ये मुख्यत्वे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम, साखर निर्यात आणि साखर उद्योगाने केलेल्या चांगल्या कामगिरीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here