सोलापूर : भारतीय शुगर या देश पातळीवर नामांकित संस्थेतर्फे आयोजित ११ व्या परिषदेमध्ये सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट आर्थिक पुनर्रचना व व्यवस्थापनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे भारतीय शुगरने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरचे संचालक प्रो. नरेंद्र मोहन व इतरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री शंकर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबाराजे देशमुख, संचालक चंद्रकांत शिंदे, नंदन दाते, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, शेतकी अधिकारी ए. पी. गायकवाड, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह पी. शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह पी. शिंदे, दत्त शिरोळ कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, जवाहर साखर कारखाना हुपरीचे कार्यकारी मनोहर जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.