श्रीपती साखर कारखान्याचे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

सांगली: जत तालुक्यातील डफळापूर येथील श्रीपती साखर कारखान्याने आगामी २०२३ – २०२४ हंगामात पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती संचालक महेंद्र लाड यांनी दिली. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते तोडणी वाहतूक ऐडव्हान्स रकमेचे वाटप करण्यात आले.

लाड म्हणाले, शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी श्रीपती कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केल जात आहेत. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर दिला जात आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस उत्पादन आणि साखर उतारा देणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डफळापूरचे सरपंच सुभाष गायकवाड, रामपूरचे सरपंच मारुती पवार, चंद्रशेखर सावंत, धैर्यशील सावंत आदीसह संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here