कोल्हापूर : कागल येथील श्री अन्नपूर्णा शुगर ॲण्ड जॅगरी वर्क्सच्या चौथ्या गळीत हंगामाचा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘अन्नपूर्णा’चे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे होते. ‘श्री अन्नपूर्णा शुगर’चा गळीत हंगाम प्रारंभ माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते, तर काटापूजन सत्यजित जाधव, महेश कोरी, अंबरिशसिंह घाटगे, अरुणराव इंगवले, विजय देवणे यांच्या हस्ते झाले. सत्यनारायण पूजा संचालक सुभाष करंजे यांचे हस्ते करण्यात आली.
संजयबाबा घाटगे म्हणाले, सभासदांच्या विश्वासावर कारखान्याची दमदार वाटचाल सुरु आहे. शेतकरी, सभासदांनी यंदाही चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनील शिंत्रे, धनराज घाटगे, नानासो कांबळे, महेश देशपांडे, चीफ केमिस्ट सुनील कोकीडकर, चीफ अकोटंट शामराव चौगले, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, कृष्णात कदम, रणजित मुडूकशिवाले, साताप्पा तांबेकर, आकाराम बचाटे, उत्तम बाडकर, बाजीराव पाटील, किरण पाटील, भैरू कोराणे, अशोक पाटील, तानाजी कांबळे, सुरेश सोनगेकर, जानदेव पाटील आदी उपस्थित होते. आभार के. के. पाटील यांनी मानले.