सोलापूर : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना चालू हंगामात शेतकऱ्यांना प्रति मेट्रीक टनास २५२५ रुपये दर देणार असल्याचे चेअरमन ॲड. धनाजीराव साठे यांनी जाहीर केले. श्री संत कुर्मदास कारखान्याचा २०२३-२४ चा १४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे जेष्ठ कर्मचारी बालाजी देवकर, गणपत रणदिवे व गणेश अनभुले यांचे हस्ते व सभासद सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधीर पाटील होते. श्री सत्यनारायण व काटा पूजन सन्मती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष देय रक्कम चंद्रकांत कांबळे व निर्मलाताई या उभयंताच्या हस्ते करण्यात आले.
ॲड. साठे म्हणाले कि, ऊस पुरवठादारांना मस्टर प्रमाणे ऊसाचे पेमेंट येणार आहे. तसेच मागील गळीत ऊसास दिवाळीसाठी ५० रुपये व ५० रुपये कपात वजा जाता राहिलेली आणि हंगाम २०२१-२०२२ मधील रक्कम जानेवारी २०२४ मध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिवाळीसाठी सवलतीच्या दरात साखर देण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतूकदारांचे मागील हंगामातील ऊस तोडणी वाहतूक बिले कमीशनसह अदा केल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन ॲड. साठे म्हणाले, यंदा २.५० लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी देवून सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी भालचंद्र पाटील, हरीदास खताळ, शशिकांत देशमुख, राहुल पाटील, विठ्ठल शिंदे, सवाजी पाटील, विजयसिंह पाटील, बाळासाहेब पाटील, मधुकर चव्हाण, नारायण गायकवाड, सिराज शेख, शंकर नाईकवाडे, संजय इंगळे, शालिनी कदम, कमल लोंढे, संध्याराणी खरात, बी. डी. पाटील, वेदांत साठे, अधिकारी, शेतकरी, वाहतुक ठेकेदार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक नारायण गायकवाड यांनी मानले.