श्रीपती शुगर लवकरच इथेनॉल प्रकल्प राबवणार : आमदार विश्वजीत कदम

सांगली : श्रीपती शुगरमुळे जत तालुक्यातील युवकांना रोजगार मिळाला आहे. हा कारखाना आमचे छोटे बाळ आहे. पुढे चालून मोठे होईल. या सोबत लवकरच इथेलॉन प्रकल्प राबवला जाईल. आगामी काळात हा कारखाना उच्चांकी दर देईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्रीपती कारखान्यालाच ऊस घालावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांनी केले. डफळापूर (ता. जत) येथे नव्याने उभारलेल्या श्रीपती शुगर आणि पॉवर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आमदार कदम म्हणाले, कारखान्याकडून येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना प्रती टन अर्धा किलो साखर दिवाळीला भेट दिली जाईल. आमदार विक्रम सावंत यांची जत तालुक्यासाठी तळमळ आहे. जत तालुक्याचा पाणीप्रश्न काँग्रेस आमदार सावंत यांनी सोडविला. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार महेंद्र लाड यांचे भाषण झाले. विजयमाला कदम, रघुनाथ कदम, शिवाजीराव कदम, स्वप्नाली कदम, ऋषिकेश लाड, नाना शिंदे, सुभाषराव गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. महेश जोशी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here