सोलापूर: सोलापूर विमानसेवेसाठी चिमणी प्रकरण अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. कारखान्याने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यामुळे चिमणी पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे चिमणी पाडण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू झाली असून ठेकेदाराला 22 लाख रूपये ऍडव्हॉन्स देण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसात सिध्देश्वर सहकारी कारखान्याची चिमणी पाडणार आणि त्याचा खर्च कारखान्याकडून वसूल करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
सात दिवसात सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून त्याचा खर्च कारखान्याकडून वसूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शासनाकडे पाठवला आहे.
दरम्यान, चिमणी स्वत:हून काढावी असे सांगून सुध्दा त्यांनी ती काढली नाही. सिध्देश्वरची चिमणी पाडण्यासाठी 56 लाखांचा खर्च येणार असून दरम्यान ठेकेदाराला 22 लाखांचे ऍडव्हॉन्स देण्यात आला आहे. त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.