सोलापूर : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग केला. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांचा ऊस गाळपासाठी वेळेत आणण्याचा कारखाना प्रयत्न राहील. हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने यांनी सांगितले. सिद्धनाथ कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ उत्साहात झाला. शेतकरी प्रथमेश पाटील व गंगाधर बिराजदार या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने, आप्पासाहेब काळे, शिवा होसाळे, चंद्रकांत खुपसंगे, नागेश बिराजदार, श्रीशैल पाटील, राम गायकवाड, सचिन गुंड, तोहीद पटेल, नागेश स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी जनरल मॅनेजर संजय जाधव, प्रोजेक्ट मॅनेजर बाळासाहेब काळे, चीफ केमिस्ट धुळा शेंबडे, रामचंद्र वाकडे, धनंजय पाटील सह कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.