सोलापूर : जिल्ह्यातील साखर उताऱ्यात फारशी वाढ न झालेला नाही. मागील वर्षी जानेवारीअखेर सिद्धेश्वर साखर कारखान्याचा साखर उतारा १० पर्यंत होता यंदा त्यात मोठी घट झाली आहे. उसातील साखरेचे प्रमाण एक टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात सिद्धेश्वर साखर कारखान्याला २५ कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी दिली.
हंगामाच्या सुरुवातीला सिद्धेश्वर कारखान्याने यंदा उसाला सर्वाधिक दर जाहीर केला आहे. फेब्रुवारीअखेर उस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ३२०० रुपये प्रती टन द्यावे लागणार आहे. कारखान्याला यंदा घटत्या साखर उताऱ्याचा फटका सहन करावा लागणार आहे. ९ टक्के साखर उतारा असल्याने कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. आधी जादा दर जाहीर केला आहे. मात्र आता माघार घेता येणार नाही. ऊस दरात बदल करणे अयोग्य ठरेल. उतारा कमी झाल्याने २५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावाच लागेल असे सिद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले.