बागपत : रालोदच्या कार्यकर्त्यांनी ६०० कोटी रुपायंच्या ऊस बिले थकबाकीप्रश्नी आणि बागपत साखर कारखान्याची क्षमता वाढविण्याची मागणी करत डीसीओ कार्यालयावर निदर्शने केली. ऊस बिले न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. रालोदचे राष्ट्रीय सचिव सुखबीर सिंह गठीना यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आंदोलनानंतर जिला ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार यांची भेट घेवून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मलकपूर, रमाला, बागपत, किनौनी व मोदीनगर यांसह विविध साखर कारखान्यांनी सहाशे कोटी रुपयांहून अधिकची ऊस बिले थकवली आहेत. ती त्वरीत देण्याची मागणी करण्यात आली. बागपत सहकारी साखर कारखान्याची क्षमता वाढविण्याची मागणी करण्यात आली. हा कारखाना ६४ वर्षे जुना आहे. त्यामुळे जवळपास २६ हजार शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. रालोदचे वरिष्ठ नेते ओमबीर ढाका यांनी सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. रालोद नेते नीरज पंडित, कंवरपाल हुड़्डा, निसार अलवी, अमित जैन, सुभाष नैन, राजू तोमर सिरसली, धीरज उज्ज्वल, ओमबीर सिंह तोमर, ॲड. श्रीकांत गुर्जर आदी उपस्थित होते.