विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यात गाळप हंगाम शुभारंभ

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गाळपाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून विजयादशमीदिनी सकाळी करण्यात आला.कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, यशवंत पाटील, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विजय देशमुख, रवींद्र काळे, गणपत बाजुळगे, श्याम भोसले उपस्थित होते.

यावेळी दिलीपराव देशमुख म्हणाले, मांजरा साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता विस्तार केल्याने शेतकऱ्यांचा ऊस तत्काळ गाळप होण्यास मदत होणार आहे. साखरेसोबतच उपपदार्थ निर्मितीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बॉयलर अग्निप्रदीपनासाठी कारखान्याचे संचालक वसंत उफाडे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन झाले. हंगामासाठी संचालक नवनाथ काळे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here