उत्तराखंडमध्ये १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता : मंत्री सौरभ बहुगुणा

ऋषिकेश : राज्यात १५ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू केला जाऊ शकतो. साखर कारखान्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि ऊस विकास मंत्री सौरभ बहुगुणा यांनी सांगितले. राणीपोखरी येथे आंचल दूध उत्पादन मेळाव्यावेळी मंत्री बहुगुणा यांनी ही माहिती दिली. दूध उत्पादकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांना दुधाचे पैसे दिले जातील असे ते म्हणाले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी अमित सिंह, ब्लॉक प्रमुख भगवानसिंग पोखरियाल, भाजप जिल्हाध्यक्ष रवींद्र राणा, सहायक संचालक दुग्धविकास प्रेमलाल, भाजप मंडल अध्यक्ष अरुण शर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here