रुद्रपूर : उत्तराखंडमध्ये ऊस बिलांचा प्रश्न आता तापला आहे. आणि या विषयावरील राजकारणानेही वेग घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. गणेश उपाध्याय यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अद्याप ऊसाची बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी जर उसाचे पैसे मिळाले नाहीत तर साखर कारखान्यांचा ऊस पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. उपाध्याय यांनी दावा केला की, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतरच ऊसाची वेळेवर बिले देण्यात साखर कारखाने अपयशी ठरले आहेत. साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे काणाडोळा करीत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.