सिंध सरकार उसाचा दर दोन दिवसांत ठरवणार : मंजूर वासन

कराची : सिंध प्रांत सरकारकडून उसाचा दर दोन दिवसांत ठरवला जाईल. उसाला प्रती ४० किलो ४२५ ते ४५० रुपये यादरम्यान दर ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर हुसेन वासन यांनी सोमवारी सांगितले. आगामी हंगामासाठी सिंध प्रांतातील उसाच्या दर निश्चितीसाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उर्दू पॉईंट वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ऊस दर निश्चितीबाबत आयोजित या बैठकीला कृषी सचिव इजाज अहमद महेसर, खासदार शाहिना शेर अली, ऊस आयुक्त, ‘पासमा’चे प्रतिनिधी, ऊस उत्पादक शेतकरी व इतर अधिकारी उपस्थित होते. त शेतकरी नेत्यांनी सिंध सरकारला उसाचा दर ४५० रुपये करण्याची मागणी केली. तर साखर कारखानदारांनी पंजाब प्रांताप्रमाणे ४२५ रुपये दर करण्याची मागणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर हुसेन वासन यांनी सांगितले की, सिंध प्रांतामधील उसाचा दर ४२५ ते ४५० रुपये यादरम्यान निश्चित केला जाईल. आगामी एक ते दोन दिवसांत याची घोषणा केली जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना परवडेल असा दर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही वासन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here