रुद्रपूर : ऊस विकास आणि साखर उद्योगाचे सचिव हरवंश सिंह चुघ यांनी सितारगंज साखर कारखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला.
livehindustan.comमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला सितारगंज कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सितारगंजचे आमदार सौरभ बहुगुणा, नानकमत्ताचे आमदार डॉ. प्रेम सिंह राणा यांनी कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कारखाना सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. वेळ कमी असल्याने सरकारला कारखाना पीपीपी तत्वावर चालिवण्यास देता आला नाही. परिणामी त्याचे आउटसोर्सिंग करण्यात आले आहे. कारखाना इंटिग्रेटेड केस टँक कन्सल्टंट प्रा. लि.ला चालविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनी देखभाल-दुरुस्तीची कामे करीत आहे. रविवारी सचिव चुघ यांनी या कामांचा आढावा घेतला. दोन बॉयलरची दुरुस्ती पूर्ण झाली असून एकाचे काम अद्याप सुरू आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अप्पर सचिव आणि एमडी उदय राज यांनी व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी सर व्यवस्थापक आर. के. सेठ, सीसीओ राजीव कुमार, मनोरथ भट्ट, आशिष त्रिवेदी, संजय पांडे, राजेंद्र सिंह, कंपनीचे अतुल दुबे उपस्थित होते.
व्हाट्सप्प पर चीनीमंडी के अपडेट्स प्राप्त करने के लिए, कृपया नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें.
WhatsApp Group Link