बुलंदशहर : विभागातील कृषी प्रधान क्षेत्राने ऊस उत्पादनात नवा टप्पा गाठला आहे. सहा जिल्ह्यांमध्ये बुलंदशहरातील सहा प्रगतशील शेतकऱ्यांची ऊस विकास विभागाने निवड केली आहे. शाहजहाँपूर आणि कर्नाल संशोधन केंद्रात ऊसाचे तयार होणारे नवे बियाणे या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. हे शेतकरी आपल्या शेतामध्ये कृषी संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल विकसित करतील. त्यानंतर सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याची विक्री केली जाईल. त्यातून नव्या प्रगातीच्या बियाण्यांचा प्रसार होणार आहे. उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्या शाहजहांपुर आमि कर्नाल केंद्राकडून समित्यांना नवे बियाणे दिले जाते. मात्र, जनजागृतीमुळे याच्या प्रसाराची गती संथ आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभागातील ११८ शेतकऱ्यांना नवे बियाणे दिले जाईल. त्यासाठी ऊस विकास विभागाने चांगल्या पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली आहे. गेल्या पाच वर्षात नोंदणीकृत शेतकऱ्यांनी जिल्हा, विभाग आणि राज्याच्या स्तरावर उत्पादनात पुरस्कार मिळवले आहेत. अशा शेतकऱ्यांना यात समावून घेतले आहे. हे शेतकरी नव्या बियाण्यांची लागवड आपल्या शेतात करतील. ते मॉडेल विकसित होईल. कृषी विज्ञान केंद्रांतील संशोधक या ऊस पिकावर देखरेखल ठेवतील असे जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले.