मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील आठपैकी सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. भैसाना आणि मोरना कारखान्याकडे अद्याप ३०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. यापैकी फक्त भैसाना कारखान्याकडे २०२०-२१ या हंगामातील २५०.६७ कोटी रुपये थकीत आहेत.
जिल्ह्यात आठ साखर कारखाने आहेत. यापैकी सात कारखाने खासगी तर मोरना कारखाना सहकारी तत्त्वावरील आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये या कारखान्यांनी ३२४७.४९ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला.कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना २९४६.४० कोटी रुपये दिले आहेत. कारखान्यांकडे ३०१.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी फक्त दोन म्हणजेच भैसाना आणि मोरना कारखान्याकडे आहे.
खतौली, तितावी, मन्सूरपूर, टिकौला, खाईखेडी आणि रोहाना कारखान्याने शंभर टक्के ऊस बिले अदा केली आहेत. भैसाना कारखान्याने हंगामात ४४७.३७ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. कारखान्याने आतापर्यंत १९६.७० कोटी कुपये अदा केले आहेत.
नव्या गळीत हंगामाची सुरुवात असून भैसाना कारखान्याने २६ डिसेंबर २०२० पर्यंतची एकूण ४४ टक्के ऊस बिले दिली आहेत. मोरना कारखान्याने गेल्या हंगामात १६८.३८ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. त्यापैकी ११७.९६ कोटी रुपये अदा केले आहेत. एकूण ७० टक्के पैसे कारखान्याने दिले आहेत. कारखान्याकडे ५०.४२ कोटी रुपये अद्याप येणेबाकी आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, सहा कारखान्यांनी संपर्ण ऊस बिले दिली आहेत. भैसाना व मोरना कारखाने साखर विक्री करून पैसे देत आहेत. या कारखान्यांकडून त्वरीत पैसे देण्याची कार्यवाही केली जात आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link