नवी दिल्ली : खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने सोमवारी सांगितले की, यंदाचा मान्सून ९४ टक्के म्हणजे ‘सामान्य पेक्षा कमी’ असेल अशी अपेक्षा आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सामान्य पेक्षा कमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आधीच्या अनुमानात पाऊस सामान्य पेक्षा कमी असेल असा अंदाज व्यक्त केला होता. सामान्य पाऊस कोसळण्याची शक्यता फक्त २५ % आहे. तर LPA (LPA: Long Period Average) ९४ % पाऊस होण्याचे अनुमान आहे. दुष्काळ पडण्याची शक्यता २० % आहे.
याबाबत माहिती देताना स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी म्हटले आहे की, तीन डिप ला नीनाच्या प्रभावामुळे दक्षिण-पश्चिम मान्सूनने गेल्या हंगामात सामान्य/सामान्य स्थिती पेक्षा अधिक पाऊस कोसळला. आता ला नीना समाप्त झाला आहे. प्रमुख महासागरातील आणि वायुमंडलातील चार ईएनएसओ तटस्थ स्थितीत आहेत. त्यामुळे या वेळी मान्सूनवर एल नीनोचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे पाऊस नेहमीच्या सामान्य स्थितीपेक्षा कमी होऊ शकते. आणि देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. अल नीनो परतल्याने कमकुवत मान्सूनला प्रोत्साहन मिळेल.
एल निनो शिवाय, इतर घटकही मान्सूनवर परिणाम करतात. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, हिंद महासागरातील डिपोल (IOD) मध्ये मान्सूनला पुढे नेणे आणि एल नीनोच्या दुःष्परिणामांना दूर करण्याची क्षमता आहे. IOD ला भारतीय नीनोच्या रूपात ओळखले जाते. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे एक अनियमित दोलन स्थिती आहे, ज्यामध्ये पश्चिम हिंद महासागर वैकल्पिकरित्या उबदार (सकारात्मक भाग) आणि नंतर महासागराच्या पूर्वेकडील भागाच्या तुलनेत थंड (नकारात्मक अवस्था) होत जातो.
स्कायमेटने म्हटले आहे की, आयओडी आता तटस्थ आहे आणि मान्सूनच्या सुरुवातीला मध्यम सकारात्मक होण्याच्या दिशेने तो वळत आहे. एल नीनो आणि आयओडीच्या टप्प्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि मासिक पाऊस पडण्यात अधिक परिवर्तनशीलता असू शकते. पावसाळी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक असामान्य स्थिती राहील.
भौगोलिक शक्यतांच्या संदर्भात, देशाच्या उत्तर आणि मध्य भागामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सुनच्या मुख्य महिन्यांमध्ये पुरेसा पाऊस पडणार नाही. उत्तर भारतातील धान्याचे कोठार मानल्या जाणाऱ्या पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हंगामाच्या दुसऱ्या भागात सामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस होईल.