गगनाला भिडणार्‍या साखरेच्या किमतींमुळे ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ

लंडन : फळे आणि भाजीपाल्याच्या तुटवड्यासह जागतिक स्तरावरील साखरेच्या किमतीमधील वाढीने ब्रिटनला ऐतिहासिक महागाईच्या उच्चांकापर्यंत पोहोचवले आहे. ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियमच्या म्हणण्यानुसार, ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीतील महागाईचा दर १५ पासून १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. द ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने या महिन्याच्या सुरुवातीला याचा खुलासा केला आहे. खाद्यपदार्थ आणि गैर मादक पेयांच्या किमती १९७७ नंतर उच्चांकी दराने वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेलेन डिकिन्सन यांनी सांगितले की, दुकानांतील दरांतील चलनवाढ अद्याप उच्च स्तरावर पोहोचलेली नाही. जसजसा इस्टरचा सण जवळ येत आहे, तसतशी साखरेच्या वाढत्या किमतींनी काही ग्राहकांची झोप उडवली आहे. मार्च महिन्यात चॉकलेट, मिठाई आणि फिदी पेयांच्या किमतीत वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्यपदार्थ आणि कृषी संघटनेने या वर्षीच्या सुरुवातीला म्हटले होते की, भारताकडून होणारी कमी निर्यात आणि साखरेची मजबूत जागतिक मागणी यामुळे साखरेच्या किमती वाझत आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात साखरेच्या किमती ६.९ टक्क्यांनी वाढल्या. फेब्रुवारी २०१७ नंतर त्या आपल्या उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात साखरेच्या किमतीत ६.९ टक्क्यांची वाढ झाली. २०१७ नंतर हा सर्वोच्च स्तर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here