नवी दिल्ली : भारताच्या हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी गुरुवारी सांगितले की, आम्फन वादळामुळे भारतामध्ये मान्सूनची सुरुवात उशिरा होण्याची शक्यता आहे. आईएमडी प्रमुख यांनी सांगितले की, मान्सून 1 जून ऐवजी 5 जून ला केरळमध्ये पोचण्याची शक्यता आहे.
महापात्र यांनी सांगितले की, चक्रीवादळाचे देशाच्या हवामानावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम होतात. भीषण वादळ आम्फन ने कलकत्तासह सर्व पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यामध्ये भीषण हाहाकार माजला आणि या विनाशकारी वादळाने कित्येक लोकांचा जिव घेतला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.