मनीला : फिलिपाइन्समध्ये साखर उत्पादनातील वाढ सुरूच आहे. संथ गती असुनही ४.६३ टक्के वाढ झाली आहे. Sugar Regulatory Administration (SRA)ने दिलेल्या माहितीनुसार २ जानेवारीअखेर कच्च्या साखरेचे उत्पादन ६,५७,२८६ मेट्रिक टनापर्यंत (MT) पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीतील ६,२८,२८६ मेट्रिक टनापेक्षा ते अधिक आहे.
फिलिपाईन्समध्ये साखर हंगाम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होतो आणि ऑगस्टमध्ये त्याची समाप्ती होते. एसआरएच्या डेटानुसार कच्च्या साखरेची मागणी १० टक्क्यांनी वाढून ५,५९,४७४ मेट्रिक टन झाली आहे. या दरम्यान रिफाईंड साखरेचे उत्पादन वाढून २,२४,१९७.४ मेट्रिक टन झाले आहे. एकूण ऊस गाळप २.१३ टक्क्यांनी वाढून ७.८९ मिलियन मेट्रिक टन झाले आहे. चालू हंगामात एसआरएच्या अनुमानानुसार कच्च्या साखरेचे उत्पादन २.०९९७ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल. २०२०-२१ या पिक वर्षात कच्च्या साखरेचे उत्पादन २.१४३ मिलियन मेट्रिक टन पोहोचले आहे. गेल्या पिक हंगामातील २.१४५ मिलियन मेट्रिक टनापेक्षा ते थोडे कमी आहे.