हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लखीमपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
गोविंद साखर कारखान्याने साखर निर्यातीत एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. कारखान्याने छोट्या पॅकिंगमधून साखर निर्यातीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारने निर्यात होत असलेल्या कारखान्याच्या ट्रकला युनिट हेड आलोक सक्सेना यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
सध्या साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या निर्यातीमुळे कारखाना अडचणीतून बाहेर पडेल, अशी अपेक्षा कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कारखान्याला शेतकऱ्यांची थकबाकी देण्यात येणारे आर्थिक अडथळे दूर होतील. स्थानिक अॅडव्हांटे ग्रुपच्या गोविंद साखर कारखान्यात शुद्ध साखरेचे उत्पादन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शुद्ध साखरेचे एक आणि पाच किलोचे पॅकिंग निर्यात करण्यात आले आहे.
निर्यातीबाबत युनिट हेड आलोक सक्सेना म्हणाले, ‘साखर कारखान्याची ही साखर नवी मुंबईतील जवाहलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून कतारला निर्यात होणार आहे. शुद्ध साखरेच्या निर्यातीमुळे कारखान्याच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. यामुळे कारखान्याच्या पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.’ या निर्यातीमुळे ऊस उत्पादकांना वेळेवर एफआरपी मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp