ट्रॅक्टर ने चालणारे छोटे ऊस तोडणी मशीन कोल्हापूर मध्ये दाखल, छोट्या शेतकऱ्यांना होणार फायदा.

कोरोनाचा फटका जसा साखर उद्योगाला बसला तसाच ऊस उत्पादकाला सुद्धा बसला. ऊस तोडणीचा प्रश्न दरवर्षी ऊस उत्पादकांना व कारखानदारांना पडत असतो. दरवर्षी कामगारांची कमी होत असलेली संख्या आणि ठेकेदारांकडून ऍडव्हान्स पोटी घेतलेल्या रकमेची फसवणूक आणि यंदा कोरोना मुळे सर्व ऊस तोडणी कामगार आपल्या गावी अडकून आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी ऊस तोडणी कशी करायची असा यक्ष प्रश्न ऊस उत्पादकांसमोर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या मशीनची किंमत सर्वसामान्य शेतकऱयांच्या आवाक्याबाहेरची आहे. आणि या मोठया मशिन्स नी तोडणी करताना अनेक अडचणी येतात.

या सर्व अडचणी विचारात घेऊन फार्मटेक इंडिया कंपनी ने अत्याधुनिक कमी किमतीचे ऊस तोडणी यंत्र तयार केले आहे. हे ऊस तोडणी यंत्र थायलंड येथून आणण्यात आले असून शेतामध्येच यंत्राचे उदघाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील केदार पाटील व कुमार दळवी यांच्या शेतात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. ऊस तोडणी साठी दोन अडीच फुटांच्या सरीत आणि कमी क्षेत्रात ट्रॅक्टरवर चालणारे, वजनानाने हलके असे हे मशीन आहे. तसेच याची आणखी वैशिष्टयें म्हणजे या मुळे सारी मोडत नाही, १ तासामध्ये एक एकराची ऊस तोडणी १४ लिटर डीझेल मध्ये २-४ कामगार करू शकतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here