श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांसाठी अगदी माफक दरात उपचार होणार : माजी मंत्री आ.जयंत पाटील

सांगली: श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांसाठी अगदी माफक दरात तपासणी आणि उपचार पद्धती उपलब्ध करून देत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी केले. उरुण इस्लामपूर शहरात कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रा (ओपीडी) चा उद्घाटन सोहळा आ.जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या समारंभाचे प्रमुख पाहुणे तर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य केंद्रासाठी कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, कराड़ यांचे विशेष सह‌कार्य लाभल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार जयंत पाटील म्हणाले कि, या आरोग्य केंद्रातून इस्लामपूर शहरासह वाळवा,शिराळा आणि पलूस तालुक्यातील लोकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. सध्या आरोग्य खर्च महागडा आणि सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी हे आरोग्य केंद्र उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रात कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध रहाणार आहेत. येथे प्राथमिक तपासणी व उपचार केले जाणार असून पुढील तपासण्या,पुढील उपचार व शस्त्रक्रिया कृष्णा हॉस्पिटल येथे केल्या जाणार आहेत.

कृष्णा हॉस्पिटल येथे ने-आण करण्यासाठी रुग्ण वाहिकेचा सुविधा केली आहे. येथे मेडिसिन,सर्जरी, स्त्रीरोग,अस्थि रोग,कान- नाक-घसा,दंत विकार,नेत्र विकार,मनोरुग्ण, रक्त-लघवी तपासण्या आदी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. दररोज स. १० ते सायंकाळी ५ पर्यंत बाह्य रुग्ण सेवा मिळणार आहे. यावेळी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी. सावंत,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, डॉ.एन.टी.घट्टे, डॉ.प्रकाश म्हाळुंगकर, प्राचार्य मुजावर यांच्यासह राजारामबापू समूहातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here