पुणे : पुणे विभागातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत एक कोटी २१ लाख ६ हजार टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत एक कोटी १५ लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली. विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत साखर उतारा सरासरी ९.५७ टक्के एवढा असून सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मध्यावर आला आहे.
यंदा विभागात गाळपासाठी सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक ऊस उपलब्ध आहे. मात्र, पावसामुळे हंगामाच्या सुरुवातीला साखर कारखान्यांना अडचणी आल्या होत्या. पुणे विभागात सातारा, पुणे या भागातील कारखान्यांचा समावेश आहे. सध्या १७ सहकारी व १३ खासगी साखर कारखानेन्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता दोन लाख ३ हजार ७०० टन एवढी आहे. सुरू आहेत. गाळपामध्ये बारामती अॅग्रो कारखान्याने सर्वाधिक आघाडी घेतली. तर, कराडमधील यशवंतराव मोहिते व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा साखर उतारा १२ टक्के आहे.