पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम २०२०-२१ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. इतर विभागांतील कारखानेही त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत. राज्यात आतापर्यंत, २८ एप्रिल २०२१ अखेर १६७ कारखाने बंद झाले आहेत.
पुणे विभागाचा विचार केला तर या हंगामात एकूण ३१ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. आतापर्यंत २७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. पुणे विभागात २२९.३४ लाख टन उसाचे गाळप होऊन २५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या हंगामात येथील सरासरी साखर उतारा ११ टक्के आहे. आतापर्यंत साखर उतारा १०.९४ टक्के नोंदवला गेला आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २८ एप्रिल २०२१ पर्यंत राज्यात १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००६.५७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५५.५९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी उतारा १०.४९ टक्के आहे.