उत्तर प्रदेशात नव्या खांडसरी परवाना धोरणांतर्गत आतापर्यंत २८० परवाने जारी

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी गूळ आणि खांडसरी उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत. खांडसरी लायसेन्सिंग पॉलिसीनुसार करण्यात आलेले सकारात्मक बदल आणि ऑनलाईन खांडसरी लायसेन्सिंग प्रणालीमुळे लोकांची या उद्योगातील रुची वाढली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातून स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होईल. साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या खांडसरी परवाना धोरणांतर्गत आतापर्यंत २८० परवाने जारी करण्यात आले आहेत. यामध्ये १७० युनिट सुरू झाली आहेत. यांची एकूण गाळप क्षमता ७१,३५० टीसीडी आहे. या युनिटच्या संचालनासाठी ग्रामीण भागात ६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या उद्योगातून जवळपास १९२६४ लोकं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. खांडसरी युनिटच्या संचालनासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय ऊस गाळपासाठी अतिरिक्त पर्याय मिळाला आहे. यासोबतच ग्रामीण भागात खांडसरी उद्योगात गुंतलेल्या लोकांची आर्थिक स्थिती उल्लेखनीय पद्धतीने सुधारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here