पुणे : राज्यामध्ये दुष्काळ पडल्याने ऊस गाळपावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर राज्यातील सर्व ८ विभागांमध्ये २४ जानेवारी अखेर ५७४.१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी उत्पादनाचा हाच आकडा ६७२.७६ लाख क्विंटल होता. त्यामुळे यंदा राज्याच्या साखरउत्पादनात तब्बल १०० लाख क्विंटल टनाने घट झाली आहे.
गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाल्यानंतरही साखर उत्पादनाची गाडी धीम्यागतीनेच चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसालाही पुरेसे पाणी मिळाले नसल्याचे वास्तव आहे. दुष्काळामुळे उसातील पाण्याचे प्रमाण कमी होवून केवळ साखर राहिली आहे. अशा परस्थितीतही साखर उताऱ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे ही घट कारखान्यांनी केली काय? असा सवाल केला उपस्थित होत आहे.